जोपर्यंत मुलगाच हवा ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्री भ्रूण हत्या थांबणं शक्य नाही. यासाठी फक्त डॉक्टरांनाच दोष देऊन उपयोग होणार नाही. स्त्री भ्रण हत्या रोखण्यासाठी लोकांच्या मानसिकेत बदल होणं गरजेचं आहे. जोपर्यंत पुरुषसत्ताक पुरूष केंद्री विचारसरणी बदल नाही तोपर्यंत स्त्री भ्रूण हत्या, मुलींना जन्माला येण्यापूर्वीच त्यांना संपवण्याचा हा अघोरी प्रकार थांबणं अवघड आहे.
सर्वांना मैत्रिण हवी आहे, बायको हवी आहे, आई हवी आहे, बहिण हवी आहे, मग मुलगी का नको? मुलीला जन्माला येऊ दिलं जात नसेल तर आई, बायको किंवा बहिण कुठून येणार याचा विचार प्रत्येकानं करायलाच हवा.
म्हणूनच मनोरंजनासोबत समाज प्रबोधन करणा-या राजा-राणीची गं जोडी मालिकेतील स्तुत्य भाग.