कशी तशी मी नांदायला मध्ये आता स्वीटू आणि ओमच्या लग्नाचे पडघम वाजले आहेत. अनेक अडचणींचे डोंगर पार करत ही जोडी कायमची एक होण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच ओम आणि स्वीटूचा साखरपुडा झाला आहे. आता ओढ आहे ती लग्नाची. स्वीटू आणि ओम यांचा लग्न सोहळा निर्विघ्न पार पडेल का? मालविका जी स्वीटू आणि ओम यांच्या नात्याने कधीच खुश नव्हती.
स्वीटू खानविलकरांची सून होऊ नये यासाठी मालविकाने आजवर खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रेमाच्या वाटेत अनेक अडथळे निर्माण केले. पण आता मालविका ओम आणि स्वीटूचं नातं मान्य करेल कि या लग्न सोहळ्यात देखील मोहित सोबत मिळून हे लग्न थांबवण्यासाठी काही वेगळा प्लॅन करेल? या सगळ्यात ओम हे विघ्न टाळण्यासाठी काय प्लॅन करतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.