व्यक्तीच्या बाह्यरुपापेक्षा आंतरिक रुपाला कायमच महत्त्व देणं गरजेचं असतं. हाच संदेश घेऊन सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. एक अंगाने जाड असलेली मुलगी, जिला लग्नासाठी नकार येतात मात्र ती अशा व्यक्तिच्या शोधात आहे जी व्यक्ति तिच्या वजनापेक्षा तिच्या मनाचं सौंदर्य पाहील.
या मालिकेने आता प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेचा हटके विषयही प्रेक्षकांना आवडतो आहे. याच लोकप्रिय मालिकेचा आता गुजराती रिमेक होऊ घातला आहे. ‘मारु मन मोही गयो’ असं या गुजराती मालिकेचं नाव आहे.
या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. इकडे मराठी मालिकेत मात्र अभ्या आणि लतिच्या नात्यात गोड वळण येताना दिसतं आहे. लतिका अभ्याचं प्रेम स्विकारते की नकारते हे येत्या एपिसोडमध्ये समजेलच.