अभि-लतिच्या मैत्रीच्या नात्याला जणू ग्रहण लागलं आहे. अभिमन्यू आणि लतिकाच्या नात्याचे सत्य जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबसमोर आले. आणि हे सत्य लपवल्यामुळे अभि आणि लतिकाचे नातं पणाला लागलं. या खोटेपणामुळे दोन कुटुंबामध्ये द्वेषाचं बीज पेरलं गेलं आहे.
आता यांच्या मैत्रीवरही द्वेषाचं सावट पसरताना दिसतं आहे. बापुंनी जहागीरदार आणि धुमाळ यांच्या घराच्या सीमारेषेवर भिंत बांधून घेतली आहे. यामुळे आता अभि आणि लतिकाच्या मैत्रीच्या नात्यावरही बापुंच्या द्वेषाची सावली पडली आहे. एकीकडे अभिमन्यूने आईला दिलेले वचन की, मी लतिकाला घरी परत घेऊन येणार. तर दुसरीकडे, लतिकाने बापूंना दिलेला शब्द. लतिका बापूंच्या विरुध्द जाऊन अभिमन्यूला साथ देते की लेकीचं कर्तव्य पार पाडते हे लवकरच समजेल.