स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाल्यानंतर संजनाला वेध लागले ते लग्नाचे. गेली कित्येक वर्ष ती ज्या दिवसाची वाट पहात होती तो दिवस आता जवळ आलाय. ३० ऑगस्ट ही या दोघांच्या लग्नाची तारीख पक्की झाली आहे. अनिरुद्धसोबत लगीनगाठ बांधून देशमुखांच्या घरात गृहप्रवेश करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होणार का याची उत्सुकता आता वाढली आहे. लग्नामध्ये संजना नटण्याची सर्व हौस भागवून घेणार आहे. तिने या लग्नाची जय्यत तयारी केली आहे.
संजनाचं लग्नाचं स्वप्न पूर्ण होणार आहे, असं वाटतानाच संजनाच समोर एक अघटित घडतं. ऐन लग्नाच्या दिवशी अनिरुद्ध गायब झाला आहे, तिच्याशी तो संपर्कच साधत नाहीय. तो नेमका कुठे गेला आहे, त्याला लग्न करायचं आहे की नाही हे लवकरच सर्वांसमोर येईल. पण संजना मात्र ही परिस्थिती हाताळताना पूर्णपणे डगमगून गेली आहे. तिने ह्यासाठी अरुंधतीला जबाबदार धरलंय तर देशमुख कुटुंबालासुध्दा खुप बोल लावले आहेत.
अनिरुद्धच्या नावाची मेहेंदीही संजनाच्या हातावर सजली आहे. आता या दोघांचं लग्न पार पडणार की इथेही नवा ट्विस्ट येणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल. त्यासाठी न चुकता पाहा आई कुठे काय करते