लग्नासाठी संजना किती उतावीळ झालीय हे प्रेक्षकांना वेगळं सांगण्याची गरज नाही. आई कुठे काय करतेच्या प्रत्येक भागात संजनाचा हा उतावळेपणा पाहायला मिळालाय. लग्न करण्यासाठी संजना किती अधीर झालीय हे पाहून सर्वांनाच तिची कीव येतेय. अरुंधती आजारपणात देशमुखांच्या घरी विश्रांतीसाठी रहायला आल्याचे पाहून संजना घाई-गडबडीत तिच्या आणि अनिरुध्दच्या लग्नाचा मुहूर्त ठरवून टाकते.
आज 30 ऑगस्ट रोजीच्या भागात संजना आणि अनिरूद्ध यांचं लग्न होणार आहे. पण या ऐन लग्नाच्या दिवशी अनिरुध्दने संजनासोबतचा सर्व संपर्क तोडून टाकलाय, तिचे फोन कॉल्स तो घेत नाहीय. तो कुठे गेलाय हे कोणालाच माहित नाहीय. यशने फक्त आदल्या दिवशी रात्री उशिरा बाबांना घराबाहेर जाताना पाहिलंय. त्यामुळे संजना तावातावाने देशमुखांच्या घरी येऊन नेहमीप्रमाणेच कांगावा करत अरुंधतीला यासाठी जबाबदार धरते.
अनिरूद्धवर जीवापाड प्रेम करणाऱ्या संजनानेच त्याच्यावर हात उचलला आहे.
यानंतर अरूंधती डॉक्टरकडे न जाता घरी येते. तेथे संजनाचा तमाशा सुरू असतोच. त्यावेळी संजना पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देते. यावेळी अरूंधती,"जा, पोलिसात तक्रार कर. मग मी ही सांगेन. तू माझा, माझ्या कुटुंबियांचा, मुलांचा मानसिक छळ केला आहेस.' यानंतर संजना शांत होते. पण त्याचवेळी अरूंधतीच्या मोबाइलवर अनिरूद्धचा फोन येतो. मला तुझ्या एकटीशी बोलायचं. आपण घराबाहेर भेटूया का? असं विचारतो. पण त्याचवेळी अरूंधती तुम्ही घरी या. सगळे घरीच आहेत असं सांगते. अनिरूद्ध घरी देखील येतो. पण तो संजनाच्या नजरेला नजर देत नाही. हा सगळा प्रकार संजनासाठी धक्कादायक असतो. अनिरूद्ध दुसऱ्यांदा लग्नाच्या दिवशी निघून जातो. यामुळे रागाच असलेली संजना अनिरूद्धच्या कानाखाली वाजवते.
अनिरुध्द संजनासोबत बोहल्यावर चढणार का हे पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.