By  
on  

आदिती पहिल्यांदाच भेटते आहे सिद्धार्थच्या मोठ्या कुटुंबाला, पाहा व्हिडियो

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून हटके संकल्पना पाहवयास मिळते आहे. एकत्र कुटुंबामध्ये वाढलेला सिद्धार्थ आणि मॉडर्न आणि छोट्या कुटुंबात वाढलेली आदिती यांची लव्हस्टोरी या मालिकेत दिसते आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आदिती पहिल्यांदाच सिद्धार्थच्या घरी आली आहे.

 

 

सिद्धार्थ त्याची मैत्रिण शुटिंगसाठी घरी आली होती असं सांगतो. घरचे त्याला मैत्रिणच होती ना असं विचारतात. त्यावर तो होकार देतो. डॉक्युमेंट्री बनवण्यासाठी त्याची मैत्रिण घरी आल्याचं तो सांगतो. पण ती निघून गेल्याचं त्याला समजतं. तेवढ्यात घरचे आदितीला परत घेऊन येतात. आता सिद्धार्थचं इतकं भलं मोठं कुटुंब पाहून आदितीची प्रतिक्रिया काय असेल हे लवकरच समजेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive