‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत आलेल्या मोठ्या ट्वीस्टमुळे प्रेक्षकांचा चांगलाच विरस झाला आहे. स्वीटूचं लग्न ओमसोबत न होता मोहितसोबत होतं. त्यातही नवरदेव कुठे आहे याचा कुणालाही थांगपत्ता नसतो. तर मोहित स्वीटूसोबत लग्नासाठी तात्काळ होकार देतो. हे सगळं पाहून प्रेक्षक मात्र चांगलंच नाराज झाले आहेत.
मात्र आता या मालिकेत आणखी नवा ट्विस्ट आलाय. प्रेक्षकांची निराशा दूर करण्यासाठी एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. अभिनेत्री प्रिया मराठे आता या मालिकेत दिसणार आहे. प्रियाची व्यक्तिरेखा सकारात्मक असून ओम आणि स्वीटूला एकत्र आणण्यासाठी मदत करताना दिसणार आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखेबाबत प्रिया म्हणते, ‘मालिकेत माझ्या व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे याचा मला खूप आनंद आहे. ओम आणि स्वीटू यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्यात माझ्या व्यक्तिरेखेचा मोठा सहभाग असणार आहे. मी सकारात्मक; पण तितकीच ठसकेबाज भूमिका निभावताना दिसेन. त्यामुळे ती प्रेक्षकांनाही आवडेल याची मला खात्री आहे.’