फुलाला सुंगध मातीचा ही मालिका प्रेक्षकांच्या खुप आवडीची आहे. पत्नीच्या सुखासाठी सतत प्रयत्नशील असलेला नवरा सर्वांनाच भावतोय. किर्ती-शुभमची जोडी खुप लोकप्रिय ठरतेय.
आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगणा-या किर्तीच्या आई-वडीलांचं निधन झाल्याने भाऊ तिचं लग्न अशा घरात लावून देतो तिथे शिक्षणाला काहीच महत्त्व नाही. पण त्या घरात आल्यावर किर्ती त्या कुटुंबाशी आणि तिथल्या माणसांशी जुळवून घेते. घरची सून म्हणून सर्व कर्तव्य पार पाडते. पती शुभमची यात तिला खंबीर साथ असते. दोघांच्यात हळूवार फुलणारी प्रेकहाणीसुध्दा खुप हद्यस्पर्शी आहे.
अचानक एकदा शुभमला किर्तीच्या एका पत्रामुळे तिचं आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं असल्याचं समजतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण किर्तीला प्रोत्साहित करायला हवं असं शुभमचा प्रय्तन असतो. पण नेहमीप्रमाणेच जिजी अक्काकिर्तीच्या शिक्षणाला नकार देतात. त्यांचा मान राखण्यासाठी किर्ती आपलं स्वप्न बाजूला ठेवते.
शुभम किर्तीला त्याच्या डोक्यावर हात ठेवून हे कबुल करण्यास सांगतो की तिचं पोलिस अधिकारी बननण्याचं स्वप्न नाहीय, किर्ती ही शपथ घेईल का, जिजी अक्का तिला पोलिस अधिकारी बननण्यासाठी परवानगी देतील का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.