'मुलगी झाली हो' या मालिकेत एक वेगळाच विषय प्रेक्षकांसमोर आणला. ज्या मुलीला तिच्या जन्माच्या वेळी तिचा बाप जीव घेणार होता तोच बाप मुलीला प्रेमाने स्विकारतानाची हळवी गोष्ट या मालिकेत दिसते आहे.
‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत एकमेकांची स्वप्नं समजून घेणं आणि पूर्ण करायला साथ देण्याची गोष्ट आहे. या मालिकेत शुभम आणि किर्तीच्या उमलत जाणा-या प्रेमाची गोष्ट आहे.
या दोन्ही मालिकांनी एक वर्षं पुर्ण केलं आहे. वाहिनीने यासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यावेळी पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ‘आज 'फुलाला सुगंध मातीचा' आणि 'मुलगी झाली हो' मालिकेला १ वर्ष पूर्ण होत आहे...या १ वर्षाच्या प्रवासात आपण मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!’