By  
on  

डब्यामुळे होणार का नेहा आणि यशमध्ये भांडणं, पाहा व्हिडियो

‘तुझी माझी रेशीमगाठ’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनाची चांगली पकड घेतली आहे. या मालिकेतील परी, यश आणि नेहाचं बाँडिंग प्रेक्षकांना आवडतं आहे. मालिकेत दाखवण्यात येणारी कथा, मालिकेतील अनुभवी कलाकार, उत्कृष्ट छायाचित्रण यामुळे मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक बनली आहे.

 

 

या मालिकेत अनेक वळणं येताना दिसतात. आता मात्र मजेशीर पण गोड घटना घडणार आहे. यशकडून नेहाचा डबा हरवला आहे. यावर यश परीकडून सल्ला घेतो. त्यावर परी त्याला आई थोडी डेंजर असल्याचं सांगते. यावर यश तिला तसलाच पण नवीन डबा आणून देतो. यावर ती यशवर रागावते. आता नेहाचा रुसवा यश काढू शकेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive