‘रंग माझा वेगळा’ मालिका घेणार 8 वर्षांचा लीप, पाहा व्हिडियो

By  
on  

रंग माझा वेगळा मालिकेत आता नवीन वळण येताना दिसणार आहे. ही मालिका जवळपास आठ वर्षांनी लीप घेताना दिसेल. या मालिकेत आता दीपिका आणि कार्तिकी मोठ्या झालेल्या प्रेक्षकांना दिसणार आहेत. मालिकेच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये दीपिका आणि कार्तिकी दिसणार आहेत. या व्हिडियोमध्ये त्या दोघीही मोठ्या झालेल्या दिसत आहेत.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

विशेष म्हणजे या दोघींमध्ये मैत्रीही होताना दिसते आहे. आता या दोघींची जवळीक दीपा आणि कार्तिकला एकत्र आणू शकेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. या मालिकेत कार्तिकीच्या भूमिकेत साईशा भोईर दिसणार आहे.

Recommended

Loading...
Share