छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते'. या मालिकेत सतत नवनवे ट्विस्ट येत असतात. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांंच्या पसंती उतरतेय.
हट्टास पेटून अखेर संजनाने अनिरुध्दशी लग्नही केलं आणि देशमुखांच्या घरात मानाने राहिलासुध्दा आलीय. पण कांचन आजीची तब्येत ठीक नसल्याने तिची काळजी घेण्यासाठी अरुंधतीसुध्दा तिथेच रहातेय. त्यात अप्पांनी समृध्दी बंगला अनिरुध्दसोबत अरुंधतीच्याही नावावर केला आहे. त्यामुळे कायद्याने ती इथेही राहू शकते. आता संजना व अरुंधती एकाच छताखाली वावरत आहेत. खटकेही उडतायत. संजनाला या घरातल्यांशी अजिबात जुळवून घ्यायचं नाहीय. पण सून म्हणून मिरवायचंही आहे. हे आपल्याला अलिकडच्या भागांमध्ये पाहायला मिळालंच आहे. ़
गोकुळाष्टमी साजरी झाल्यानंतर आता देशमुख कुटुंबियांकडे बाप्पाचं जल्लोषात आगमन होणार आहे. परंतु इथेही संजना अरुंधतीवर मात करु पाहते. बाप्पाला सर्वजण घरी घेऊन आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे अरुंधती पुढे होऊन बाप्पाला ओवाळायला जाते, तोच संजना तिला अडवते. हा मान आता घरची सून म्हणून माझा आहे असं तिला सुनावत आरतीचं ताट स्वत:च्या हातात घेते.