छोट्या पडद्यावरची ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक. या मालिकेतली ओम-स्विटूची लव्हस्टोरी सर्वांनाच खुप भावते. पण ओम-स्विटूचं लग्न न झाल्याने अनेकांचा प्रचंड हिरमोड झालाय. त्यामुळे ओम-स्विटू पुन्हा कधी एकत्र याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
घरातील सर्वजण आनंदी रहावे म्ह्णून स्विटू सतत आपण आनंदी असल्याचं दाखवत असते. जरी स्वीटूचे लग्न मोहितशी झाले असले तरी अजूनही या मालिकेचे चाहते त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.
झी मराठीने नुकताच प्रदर्शित केलेल्या प्रोमोवरुन असं दिसतंय की, मालिकेत लवकरच स्वीटू आणि ओमकारच्या प्रेम कथा पुन्हा नव्याने सुरू होणार. मालिकेत तुम्ही पाहिलं असेल की ओमकार स्वतःच्या घरी राहात नव्हता. मात्र आता येणाऱ्या भागात ओमकार घरी परत येईल. या प्रोमोमध्ये स्वीटू ओमकारला पाहुन् खुश होते. एका दृश्यात तिच्या हाताला चटका बसतो हे बघताच तो तिला मदत करत तिला ओरडतो आणि काळजी घेताना आपल्याला दिसत आहे.