अखेर लतिका व्यक्त करणार का तिचं अभ्यावरील प्रेम? पाहा व्हिडियो

By  
on  

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत आता रोमॅंटिक वळण येण्याची शक्यता आहे. अभ्या आणि लतिच्या नात्यात आलेला दुरावा आता लवकरच संपणार आहे. बापूंच्या रागामुळे अभि आणि लतिकाच्या नात्यात दुरावा आला. पण अभिचं लतिकावर असलेलं निस्सिम प्रेम सगळ्यांना माहिती आहे. केवळ लतिकाला या प्रेमाची जाणीव नाही. 

नंदिनीच्या येण्याने लतिकाला अभ्यावरील हक्काबाबत असुया वाटू लागली. पण याचं प्रेमात रुपांतर होण्यासह अभ्या आणि मित्रांनी एक प्लॅन केलेला असतो. या प्लॅन दरम्यान लतिका अभ्याशिवाय जगू शकत नसल्याचं कबूल करते. पण काही क्षणातच हा प्लॅन असल्याचं लक्षात आल्यावर लतिकाने मात्र रौद्ररुप धारण केलं. आता या प्लॅनचा लतिका- अभिच्या नात्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो हे लवकरच समजेल.

Recommended

Loading...
Share