'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत पटकथा, विषय आणि कलाकार यांच कमाल कॉम्बिनेशन आहे. मोठ्या भावाचा आदर करणारी आणि त्याचा शब्द पाळणारे त्याचे भाऊ या मालिकेच्या निमित्ताने घराघरात पोहोचले. नुकतंच या मालिकेने 400 भागांचा टप्पा गाठला आहे. या निमित्ताने सरुच्या भूमिकेत दिसणारी नंदिता पाटकरनेही याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
नंदिता या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणते, ‘आज सादर होत आहे 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेचा ४०० वा एपिसोड.. आपण या ४०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..’