'मुलगी झाली हो' या मालिकेत सध्या विविध वळणं पाहायला मिळत आहेत. साजिरीचं शौनकवर असलेलं प्रेम तर विलासचा शौनकवरचा अविश्वास याच्या कात्रीत साजिरी सापडली आहे. पण या सगळ्या धामधुमीत मालिकेने 300 भाग पुर्ण केले आहेत. यावेळी वाहिनीने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत. ‘
आज सादर होत आहे 'मुलगी झाली हो' मालिकेचा ३०० वा एपिसोड.. आपण या ३०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..!! त्याचबरोबर या मालिकेचे लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!! आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..!