‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांचा मनात स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाली आहे. मालिकेत आता नवं वळण येताना दिसत आहे. संजनाने हट्टाने भांडून अनिरुद्धच्या घरात जागा मिळवली आहे. पण त्या मार्गातील अडथळ्यांना आता कुठे ती सामोरी जाताना दिसते आहे.
तर दुसरीकडे अरुंधती मात्र नव्या क्षितीजाला गवसणी घालण्यास सिद्ध झाली आहे. अरुंधतीने नवी नोकरी जॉईन केली आहे. आता नव्या प्रवासात तिच्यासमोर कोणती आव्हानं उभी राहतात हे समजेलच.