दिलदार प्रेमाची हटके गोष्ट ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत पाहायला मिळाली. लतिका अभिच्या समंजस नात्याला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. या मालिकेद्वारे लठ्ठपणाचा मुद्दा अत्यंत हळूवारपणे हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
सुंदर असणं म्हणजे नक्की काय? याचा पुन्हाएकदा विचार कारायला भाग पाडणारी सुंदरा म्हणजेच लतिका महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये भरली, प्रेक्षकांनी मालिकेला उदंड प्रतिसाद दिला आणि अजूनही देत आहेत. या मालिकेने नुकतंच 350 भाग पुर्ण केले आहेत. यानिमित्ताने अभि-लतीने म्हणजेच समीर परांजपे आणि अक्षया नाईकने खास व्हिडियो शेअर केला आहे. यात दोघांनीही मालिकेला मिळालेल्या प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.