हट्टास पेटून अखेर संजनाने अनिरुध्दशी लग्नही केलं आणि देशमुखांच्या घरात मानाने राहिलासुध्दा आलीय. पण अनिरुद्धशी लग्न करुन आल्यापासून संजना सतत अरुंधतीला काहीना काही बोलत असते. संजना व अरुंधती एकाच छताखाली वावरत आहेत. खटकेही उडतायत. संजनाला या घरातल्यांशी अजिबात जुळवून घ्यायचं नाही. त्यामुळे अरुंधतीला कमी लेखण्याची संधी ती अजिबात सोडत नाही.
आताही ती अरुंधतीचं गाण्यातील करिअर यावरुन यशला खडे बोल सुनावते. पण यश त्याच अंदाजात तिला उत्तर देतो. संजना अरुंधतीच्या वेशभुषेमुळे तिचं गाण्यात करिअर होणार नाही हे सांगते. पण यावर यश तिला लता मंगेशकरांचं उदाहरण देतो. यासोबतच हे देखील सांगतो की आईसोबत यश आहे त्यामुळे तिला करिअर मध्ये अडचण येणार नाही.