प्रेमामध्ये प्रत्येकालाच परीक्षा द्यावी लागते आणि असेच काहीसे अभि – लतिकाबद्दल झाले आहे. दोन कुटुंबात वाढत असलेल्या दुरावा आणि कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे. कारण अभिमन्युला याची खूप मोठी शिक्षा भोगावी लागते आहे.
अभ्याच्या प्रेमाची जाणीव लतिकालाही होताना दिसते आहे. तिरस्कार, मैत्री आणि आता प्रेमाच्या वाटेवर आलेला हा प्रवास आता नवं वळण घेताना दिसतो आहे. शर्यतीसाठी लतिका अभिला शुभेच्छा देताना दिसत आहे. यावर अभ्या तिला तिची जागा कोणीच घेणार नसल्याचं सांगतो. आता लतिका अभ्याच्या शर्यतीवेळी पोहोचेल का ? या दोघांचं नातं आता कोणत्या नव्या वळणावर जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.