By  
on  

प्रेक्षकांचा लाडका शिवा म्हणजेच अशोक फळ-देसाई आता येतोय या मालिकेतून भेटीला

'जीव झाला येडापिसा'  या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील शिवा हा कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रिय झाला. अभिनेता अशोक फळ देसाई या भूमिकेत दिसला. शिवाचा फिटनेस त्याची बोलण्याची लकब ही प्रेक्षकांना प्रचंड आवडली. अशोकची ही पहिलीच मालिका होती. 

 

 

त्यानंतर अशोक ‘मेहंदी है रचनेवाली’ या हिंदी मालिकेतही दिसला होता. आता मात्र तो हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ‘आभाळाची माया’ असं त्याच्या नव्या मालिकेचं नाव आहे. जयदेव हे त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा भाऊ या मालिकेत अशोक साकारतो आहे. नव्याने सुरु होत असलेल्या सन मराठी या वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive