सुरु झाला कुसुम आणि अनुजच्या मैत्रीचा नवा अध्याय, पाहा व्हिडियो

By  
on  

सोनी मराठी वाहिनीवर 'कुसुम' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासार आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज असा दृष्टीकोन कुसुम देताना दिसते आहे.

 

 

आता कुसुमच्या आयुष्यात नवं वळण येताना दिसत आहे. कुसुम आणि अनुजची नुकतीच भेट झाली आहे. यादरम्यान अनुजने तिला मैत्रीपासून सुरुवात करण्याचं सुचवलं. एका रेस्टॉरंटमध्ये अनुज आणि कुसुमची भेट होते. यावेळी तो तिला सुशी खाण्यासही शिकवतो. आता या दोघांचं नातं कसं फुलत जातं हे पाहणं रंजक ठरेल.

Recommended

Loading...
Share