By  
on  

रणजित पुन्हा दिसणार वर्दीमध्ये, उरणार नाही संजूच्या आनंदाला नाही पारावार

 राजा रानीची गं जोडी या मालिकेत सध्या विविध वळण पाहायला मिळतय. या मालिकेत अखेर तो क्षण आला ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. संजीवनीच्या डोळ्यात असलेलं स्वप्न पुर्ण होताना दिसत आहे. संजीवनीच्या वडिलांमुळे रणजितला आपली नोकरी गमवावी लागली. रणजित ढाले- पाटील या नावाला असलेलं मान मरातब सगळं एका क्षणात निघून गेलं.

 

 

 

पण आता संजुने आता रणजीतचे स्वप्न पूर्ण केलं. PSI झाल्यापासून तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण संजु घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडताना दिसते आहे. आता तिला साथ मिळणार आहे रणजितची. रणजितला पुन्हा त्याची वर्दी परत मिळणार आहे. रणजित आता असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस म्हणून नव्याने रुजू होणार आहे. त्यामुळे आता संजू विरोधात कारस्थान रचणा-यांचं काही खरं नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive