By  
on  

प्रेक्षकांना अनुभवता येणार भक्तीरसाने ओथंबलेला दीड तास

 सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' आणि 'ज्ञानेश्वर माउली' या मालिका सध्या रोज एक तास प्रेक्षकांना भक्तिरसाचा आनंद देताहेत. पण २५ ऑक्टोबरपासून या आनंदात भर पडणार आहे. प्रेक्षकांना संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून दीड तास या भक्तीरसाचा आस्वाद घेता येणार आहे. या दीड तासात 'गाथा नवनाथांची' मालिकेत मच्छिन्द्रनाथांचे स्त्रीराज्यात आगमन होणार असून राज्यातल्या स्त्रियांना नाथांबद्दल कुतूहल आहे. लवकरच मैनावतीचा नाथांशी विवाह होणार असल्याचीही शक्यता आहे. 

 

 

मैनावतीने पाठवलेल्या गोष्टी नाथ स्वीकारणार का, मैनावतीने जाहीर केलेल्या उत्सवाला नवीन वेश परिधान करून जाणार का; याची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत. मालिकेत मोठ्या गोरक्षनाथांचा प्रवेशही होणार आहे. गुरू संकटात आहेत आणि त्यांना शोधून त्या संकटातून सोडवलं पाहिजे या हेतूने गोरक्षनाथांचा प्रवास सुरू होताना दिसणार आहे. तर 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत माउली आणि त्यांची भावंडं यांचा आई-वडिलांच्या देहान्त प्रायश्चित्तानंतरचा खडतर प्रवास सुरू होणार आहे. मुक्ताई आजारी पडल्यावर तिच्यासाठी सप्तपर्णीचे वेल  आणण्यासाठी माउली स्वतः निबिड अरण्यात जाणार. तिथे त्यांचा सापाशी सामना होणारा. माउलींना स्फुरलेला दिवाळी अभंग, त्यांनी साजरी केलेली दिवाळी, शुद्धिपत्रासाठी सुरू झालेली पैठण यात्रा आणि माउलींकडून झालेली हरिपाठाची निर्मिती; असे अनेक अनोखे प्रसंग प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive