By  
on  

‘येऊ कशी तशी.....’ मालिकेत येणार नवा ट्वीस्ट, काय असेल स्वीटूच्या लग्नाचं भविष्य

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका अल्पावधितच लोकप्रिय झाली आहे. स्वीटू आणि ओम या क्यूट जोडीने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.  स्वीटूचं मोहितशी लग्न झाल्यावरही या जोडीविषयीचं चाहत्यांचं प्रेम कमी झालं नाही. जरी स्वीटूचे लग्न मोहितशी झाले असले तरी अजूनही या मालिकेचे चाहते त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.

 

 

पण मालिकेतील सध्याच्या घडामोडीवरुन असं वाटत आहे की, स्वीटू लवकरच मोहीतपासून वेगळी होणार आहे. मोहीत आणि त्याची आई मिळून स्वीटूचा छळ करत आहेत. लवकरच ही गोष्ट ओमसमोर येणार आहे. त्यानंतर ठोस पाऊल उचलत ओम स्वीटूला त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे. सोबतच मोहीत आणि स्वीटू यांचा घटस्फोटही होणार आहे. मालिकेतील नवा प्लॉट पाहून प्रेक्षक आनंदित झाले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive