By  
on  

अंतरा मल्हारच्या सोबतीने फॅक्टरीमधील सत्य उजेडात आणेल का?

‘जीव माझा गुंतला’ मालिका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मल्हारने देखील अंतराला अजून बायको म्हणून स्वीकारले नाहीये. अंतरा कुठेतरी सगळं सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते आहे. यातच मल्हारच्या फॅक्टरीमध्ये अंतराने कामाला सुरुवात केली आहे. पण या दरम्यान व्यवस्थापनात तिला काहीतरी काळेबेरे असल्याची जाणीव झाली आहे. 

 

 

अंतरा आता हे सत्य मल्हारसमोर आणण्याची तयारी करते आहे. यासाठी तिने मल्हारचं रुप बदलण्याची तयारी केली आहे. ती मल्हारची वेशभुषाही बदलणार आहे. वेगळ्या वेशभुषेतील मल्हारला  अंतरा फॅक्टरीमध्ये घेऊन आली आहे. आता नक्की कोणतं सत्य उजेडात येईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive