'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा मालिका स्वरुपात अनेकदा आपण पाहतो. मात्र यासोबतच या मालिकेत शिवबाच्या शिलेदारांची कथा पाहायला मिळाली.
या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकला. सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडेंच्या भुमिकेत दिसतील. तर अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारली. ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर येत आहे.
एका न्युज पोर्टलने याबाबतची माहिती शेअर केली आहे. मालिका बंद होण्याचं कारण टीआरपी असल्याचं बोललं जात आहे. 22 नोव्हेंबरला या मालिकेच्या शुटिंगचा शेवटचा दिवस असल्याचं समोर येत आहे.