कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. नव-याचा गेलेला मान परत मिळवण्यासाठी संजीवनी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसते आहे.
पण रणजितच्या निर्णयानंतर मात्र तिला पेचप्रसंगात पाडलं आहे.
वडिलांमुळे रणजितला नोकरी गमवावी लागली आहे. याची जाण ठेवून संजीवनीने रणजितला पुन्हा एकदा पोलिस खातं जॉईन करण्यासाठी गळ घालते. पण रणजित मात्र संजीवनीची ही इच्छा पहिल्यांदा डावलताना दिसते आहे. रणजितने पुन्हा पोलिस खातं जॉईन न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाचा संजीवनीवर काय परिणाम होतो? संजीवनी त्याचं मन वळवण्यास तयार होते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.