‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत आता प्रेक्षकांना हवं असलेलं वळण येऊ घातलं आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत आता रोमॅंटिक वळण येण्याची शक्यता आहे. अभ्या आणि लतिच्या नात्यात आलेला दुरावा आता लवकरच संपणार आहे. बापूंच्या रागामुळे अभि आणि लतिकाच्या नात्यात दुरावा आला. पण अभिचं लतिकावर असलेलं निस्सिम प्रेम सगळ्यांना माहिती आहे.
आता या नात्याला आता बापूंच्या संमतीचं कोंदण लागणार आहे. इतके दिवस बापूंना सत्य कळताच त्यांनी त्या दिवसापासून मुलीच्या प्रेमापोटी खोट्या संसारतून तिला बाहेर काढलं होतं. पण आता बापूच लतिकाला पुन्हा अभ्याकडे जा असं सांगणार आहेत. आता यावर माईंची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.