‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत आलेल्या मोठ्या ट्वीस्टमुळे प्रेक्षकांचा चांगलाच विरस झाला होता. स्वीटूचं लग्न मोहितसोबत झाल्याने मालिकेचे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. टू आणि ओंकार यांचं लग्न न दाखवल्याने मालिका सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती. सगळ्यांची आवडती मालिका अचानक प्रेक्षकांची नावडती झाली होती. परंतु, आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना अपेक्षित गोष्ट मालिकेत घडणार आहे.
झी मराठीने नुकताच प्रदर्शित केलेल्या प्रोमोवरुन असं दिसतंय की, मालिकेत लवकरच स्वीटू आणि ओमकारची प्रेम कथा पुन्हा नव्याने सुरू होणार. स्वीटू मोहितसोबत नात्याचा घटस्फोटाने शेवट करणार आहे. तर या दरम्यान ओम आणि स्वीटूचं नात पुन्हा सुरु होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ओम आणि स्वीटू रोमॅंटिक मूडमध्ये दिसते आहे. प्रेक्षकांनी या प्रोमोचं कौतुक केलं आहे.