या मालिकेतून अभिनेत्री मधुरा वेलणकर –साटमचं 12 वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक

By  
on  

लेखन आणि सिनेमा या दोहोंमध्ये नाव कमावल्यानंतर मधुरा वेलणकर आता छोट्या पडद्यासाठी सज्ज झाली आहे. मधुरा सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत दिसणार आहे.

 

 

 अखेर १२ वर्षानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर. आमच्या संपूर्ण टीमला देवाने आशीर्वाद द्यावे’ हे कॅप्शन देत मधुराने मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.  बेपत्ता असलेल्या मुलीची आई यात मधुराने साकारली आहे.  जी एका शाळेत शिक्षिका आहे. मधुरासोबत मालिकेत हरीश दुधाडे, आशिष कुलकर्णी देखील मुख्य भूमिकेत आहेत.

Recommended

Loading...
Share