By  
on  

'इंडियन आयडल मराठी' च्या ग्रँड प्रिमियरमध्ये नाशिकच्या प्रतिक सोळसेला भेटायला आली त्याची आवडती अभिनेत्री

सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाला अल्पावधीतच प्रेक्षकांनी आपलंस केलं. ऑडिशन राउंडला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धकांनी हजेरी लावली होती आणि आता त्यांतल्याच काही स्पर्धकांची थिएटर राउंडसाठी निवड झाली आहे. कोणाला निवडायचं यासाठी परीक्षक अजय-अतुल आणि बेला शेंडे यांच्यापुढे प्रश्नचिन्ह होतं. ऑडिशन राउंडला आलेल्या नाशिकच्या प्रतिक सोळसे या स्पर्धकाच्या स्वतःच्या खड्या आणि दमदार आवाजामुळे परीक्षक मोहित झाले. नाशिक शहरात भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रतिक सोळसे याला दमदार आवाजाची देणगी लाभली आहे. 
 

प्रतिक याने गोल्डन माईक मिळवत 'इंडियन आयडल मराठी' या स्पर्धेतलं स्थान निश्चित केलं. 'इंडियन आयडल मराठी'च्या ग्रँड प्रिमियरमध्ये प्रतीकची आवडती अभिनेत्री त्याच्या भेटीला आली आणि प्रतिक आश्चर्यचकित झाला. सोनी मराठी वाहिनीवरल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातली लोकप्रिय अभिनेत्री शिवली परब हिने प्रतिकला शुभेच्छा देण्यासाठी 'इंडियन आयडल मराठी'च्या ग्रँड प्रिमियरला हजेरी लावली. शिवलीला बघून प्रतिकने खास तिच्यासाठी गाणं सादर केलं. प्रतिकचं गाणं ऐकून शिवलीने त्याला स्वतःचा बँड भेट दिला आणि पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
 

 'इंडियन आयडल मराठी'च्या ग्रँड प्रिमियरमध्ये प्रतिकचं गाणं हे 'माहोल झिंगाट करणारं' पहिलं सादरीकरण ठरलं. 'इंडियन आयडल मराठी' या स्पर्धेपर्यंत पोचण्यासाठी प्रतिकने केलेल्या संघर्षाचं सोनी मराठी वाहिनीनं उपलब्ध करून दिलेल्या मंचाच्या मदतीने सोनं होईल, यात शंका नाही. प्रतिकची फॅन मोमेन्ट, माहोल झिंगाट करणारा त्याचा परफॉर्मन्स पाहा, सोनी मराठी वाहिनीवर, 'इंडियन आयडल मराठी', सोम.-मंगळ., रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive