By  
on  

'तुझ्या रूपाचं चांदनं' – गरीबाघरी सौंदर्य हे शाप आहे का ?, नवी मालिका लवकरच

सौंदर्य आणि तिरस्कार यामध्ये प्रेमाची कसोटी लागणार आहे. प्रत्येक मुलीला वाटतं असतं आपण सुंदर दिसावं. सुंदर असणं वा तसं जन्माला येणं हे काही कोणाच्या हातात नसतं ते भाग्यात असतं. पण सौंदर्यचं जर अभिशाप असेल तर ? जर सुंदर दिसणंचं पाप असेल तर ? याच आणि अश्याच अनेक प्रश्नांमधून जातं आहे आपली नक्षत्रा. नक्षत्राची आई तिला लहानपणापासून सांगत आली आहे गरीबाघरी सौंदर्य हे शाप असतं आणि म्हणूनचं तिची आई नक्षत्राचं सुंदर रूप समाजापासून लपवून ठेवतं आहे. पण काय होईल जेव्हा सुंदर रूपाचा तिरस्कार करणारा दत्ता नक्षत्राला भेटेल ? दत्ताच्या तिरस्कारला नक्षत्रा प्रेमात बदलू शकेल? नक्षत्रा तिचं खरं रूप काही कारणांमुळे लपवत आहे तो या सत्यापासून अनभिज्ञ आहे. तिरस्कार आणि सत्याच्या दुधारी तलवारीवर कसा रंगणार नक्षत्रा आणि दत्तच्या प्रेमकहाणीचा करार ? प्रेमाची परिभाषा बदलायला येत आहे “नक्षत्रा” फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा आपण देखील सहभागी होऊया तिच्या या प्रवासात “तुझ्या रूपाचं चांदनं” – गरीबाघरी सौंदर्य हे शाप आहे का ? २७ डिसेंबरपासून सोम ते शनि रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

मालिकेनिमित्त बोलताना प्रोग्रामिंग हेड, कलर्स मराठी, (वायकॉम18) - विराज राजे म्हणाले, बिग बॉसचे तिसरे पर्व जेव्हा सुरू झाले तेव्हा कुठेना कुठे आता बिग बॉस नंतर काय याचा विचार सुरू झाला होता. कलर्स मराठीवर येऊ घातलेल्या दोन्ही मालिकांचे विषय अतिशय वेगळे पण तितकेचे मनाला भिडणारे आहेत. अत्यंत महत्वाचा सामाजिक संदेश मालिकांमधून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

“तुझ्या रूपाचं चांदनं” मालिकेतील नक्षत्रा अश्या मुलीचं प्रतिनिधित्व करते ज्यांचं बालपण एका अश्या समजुतीमध्ये गेलं आहे की, गरीब घरात सुंदर म्हणून जन्माला येणे हा शाप आहे. बाह्यसौंदर्याला अधिक महत्व देणार्‍या आपल्या समाजात नक्षत्रा सारख्या अनेक मुलींना त्यांच्या रूपावरून, शरीरयष्ठी वरुन रंगावरून हिणवलं जातं, त्यांना दूषण दिली जातात. आम्ही घेऊन येत असलेल्या या दोन्ही मालिकांमुळे आपल्या समजाचा हा दृष्टीकोन बदलण्यास नक्कीच सुरुवात होईल अशी आशा आम्ही करतो. दोन्ही मालिकांमध्ये नायिकेचा तिचा संघर्ष बघायला मिळणार आहे. आम्हांला खात्री आहे या मालिका प्रेक्षकांच्या पंसतीस उतरतील.”

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive