By  
on  

संजना-अरुंधती या सवतींनी बिर्याणीवर मारला ताव, पाहा फोटो

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. गेली तीन साडेतीन वर्ष ही मालिका रसिक प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्यांची लोकप्रियतासुध्दा अफाट आहे. सोशल मिडीयावरसुध्दा या कलाकारांच्या फोटो, व्हिडीओ आणि मिम्सना खुप पसंती मिळते. 

मालिकेत संजना आणि अरुंधती या दोघी सवती म्हणजे दोन विरुध्द टोकं. जी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. अरुंधती प्रेमळ समंजस आणि साधी व तिच्या अगदी विरुध्द संजना हेखेखोर, गर्विष्ठ आणि मनाला येईल तेच करणारी व सतत वाद घालणारी. मालिकेत या दोघी जरी एकमेकांच्या विरुद्ध असल्या तरी देखील खऱ्या आयुष्यात या बहिणींसारख्या राहतात. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

संजनाने अरुंधतीसाठी चक्क आईच्या हातची स्पेशल बिर्याणी आणली होती. त्या दोघी एकाच प्लेटमध्ये बिर्याणी खातानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या दोघींना एकत्र एकाच प्लेटमध्ये खाताना पाहून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive