By  
on  

सुंदरा मनामध्ये भरली ! मालिकेत भानुप्रियाची एन्ट्री, कोण आहे ही सुंदरी?

सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची मालिका आहे. या मालिकेतील अभि-लतीची गोष्ट प्रेक्षकांना खुप भावते. त्यांच्यातील प्रेम दुरावा आणि मग पुन्हा व प्रेम अशा कथानकातील वळणामुळे या मालिकेवर रसिक विशेष प्रेम करतात. आता पुन्हा एकदा ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहचलीय. 

मालिकेत एक नवीन एंट्री होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या न्यू एंट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. या न्यू एंट्रीचं नाव भानुप्रिया आहे.

या न्यू एंट्रीचा एक नुकताच व्हिडओ समोर आला आहे. विशेष म्हणजे ही भानुप्रिया म्हणजेच अभिमन्यू म्हणजे लतिकाचा अभ्या आहे. त्याने हे रूप का आणि कशासाठी घेतले आहे हे येणाऱ्या भागातच समजेल. प्रेक्षकांना मात्र अभ्याचे हे नवीन रूप भलतेच आवडले आहे. लाल रंगाची साडी आणि हातात हिरव्या बांगड्या व वेणीत माळलेली गुलाबाची फुलं अशी ही भानुप्रियाची मनमोहक अदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत अभ्या उर्फ भानुप्रियाची एन्ट्री पाहण्याची चाहत्यंना उत्सुकता लागली आहे. 

 

कामवाली बाई म्हणून आलेली ही भानुप्रिया उर्फ अभ्या दौलतचा कसा गेम करणार हे पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.  

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive