By  
on  

ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांचं छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन!

मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपट यांत आपल्या दमदार अभिनयाने ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष जागा निर्माण केली आहे. मालिकांबरोबरच पुष्कळ सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या तर काही मराठी मालिकांत त्यांनी हळव्या नायकाचा वैशिष्ट्यपूर्ण अभिनय साकारला. विशेषत: खलनायकाच्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात त्यांनी धास्ती निर्माण केली.  आता अनेक वर्षांनी ते छोट्या पडद्यावर झळकणार असून सोनी मराठी वाहिनीवरच्या 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत राणी चेन्नम्माचा प्रधान सेवक तिम्मण्णा ही व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. ही मालिका  रंजक वळणावर पोचली असून औरंगजेबाला चकवा देत, राजाराम राजेंना जिंजीला सुरक्षित पोचवायचे, जेणेकरून त्याचे सैन्य विभागले जाईल आणि कमी सैन्यबळानिशी त्याच्याशी लढता येईल  म्हणून सौदामिनी ताराराणी आता बेदनूरची राणी चेन्नम्मा ह्यांची मदत घेण्याचे ठरवतात. 

 राणी चेन्नम्माला तिच्या राज्याची घडी बसवण्यात छत्रपती शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या मदतीची पूर्ण जाणीव आणि मनात प्रचंड आदर आणि स्वराज्यप्रेम असते, पण मध्ये आडकाठी असते ती चेन्नम्माचा प्रधान सेवक तिम्मण्णा याची. स्त्रीद्वेष्टा, सतत राज्याचं हित जपतोय म्हणत चेन्नम्मावर स्वतःचं मत लादणारा, स्वराज्य आता संपलंय असं ठाम मत असणारा असा हा तिम्मण्णा. 

 ही आव्हानात्मक भूमिका साकारताहेत ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार यासाठी पाहा, 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' सोम. ते शनि., संध्याकाळी ७:३० वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive