By  
on  

Video देवमाणूस 2 : डॉक्टर आणि निलमचं लफडं जयसिंगला कळणार का?

'देवमाणूस' या रहस्यमय थरारक मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेच्या अफाट यशानंतर आता या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेचे संपूर्ण महाराष्ट्रभर असंख्य चाहते आहेत. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरल्या आहेत. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंगच्या व्यक्तिरेखेतील किरण गायकवाड, टोण्या, सरु आजी, डिंपल, बाबूदादा, मंगलताई, बज्या, नाम्या या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

पहिल्या भागाप्रमाणेच दुस-या भागातही अनेक नवनवी पात्रं एन्ट्री घेत आहेत. यापैकीच एक म्हणजे निलम. कॉन्ट्रॅक्टरची बायको निलमकडे गडगंज पैसा असल्याने डॉक्टर उर्फ नटवरलाल तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करतोय, हे गेल्या काही भागांपासून प्रेक्षक पाहत आहेत. त्यासोबतच तिचा नवरा कॉन्ट्रॅक्टर जयसिंगलाही आपल्या गोड बोलण्याने भुरळ पाडतोय. दरम्यान, जयसिंग एकदा मुंबईला जातो सांगून घरातून निघून जातो. तेव्हा डॉक्टर व निलम त्यांच्या फार्महाऊसवर एकत्र वेळ घालवतात. पण मध्यरात्री जयसिंग गर्लफ्रेंडला घेऊन पोहचल्याने निलम व डॉक्टरची पंचाईत होते. निलम जयसिंगसमोर जाते व त्याला जाब विचारते, इथे  डॉक्टरला पैसेही नाहीत व पकडले जाण्याच्या भीतीने त्रेधातिरपट उडते. पण अचानक त्याच्या हाती पैसे लागतात व तो जयसिंगच्या तावडीतून पैसे घेऊन निसटतो. 

आता जयसिंग निलमकडून तिचं कोणासोबत अफेअर आहे, हे काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. घाबरीघुबरी झालेली निलम आता जयसिंगला डॉक्टरच्या सांगण्यानुसार तिचं बाहेर लफडं आहे हे सांगणार आणि या दोघाचं सत्य समजल्यावर जयसिंग त्यांना ठार करणार की, आणखी काही घडणार हे देवमाणूसच 2 च्या येत्या भागात पाहणं रसिकांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive