By  
on  

आई कुठे काय करते : अरुंधती व आशुतोषचा वर्तमानपत्रातील फोटो पाहून अनिरुध्दने तो फाडून टाकला

 

आई कुठे काय करते ही मालिकेत अनेक वळणं येतायत. अभिषेक अनघाचं लग्न साग्रसंगीत पार पडल्यानंतर आता अरुंधती स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाटी देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतेय. अाश्रमातील नोकरी, म्युझिक अल्बम व म्युझिक स्कूलच्या कामाला ती सुरुवात करणार आहे. आशुतोष व अरुंधतीची मैत्री अनिरुध्दला पहिल्यापासूनच पटत नाही. त्यात अनिरुध्द महिनोंमहिने घरी बसलाय. अरुंधती मात्र करिअरमध्ये पुढे जातेय हे त्याला सहन होत नाहीय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

आता आशुतोष अरुंधतीला गायिका म्हणून लॉंच करणार आहे. त्याची बातमी एका वर्तमानपत्रात छापून आली होती. त्या जाहिराती विषयी कळल्यानंतर अनिरुध्दची कशी प्रतिक्रिया असते ते दाखवण्यात आलं आहे. सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अप्पा हॉलमध्ये वर्तमानपत्र घेऊन येतात आणि अरुंधतीला तिच्या फोटोविषयी सांगतात.

हे ऐकल्यानंतर घरातले सगळे खूश होऊन पेपर पाहू लागतात, तेव्हा यश म्हणतो, आई आणि आशुतोषचा पेपरमध्ये फोटो छापून आला आहे. हे ऐकल्यावर मात्र अनिरुद्धच्या चेहऱ्यावरील रंग बदलतो. पुढे यश संपूर्ण बातमी वाचून दाखवत असताना अनिरुद्ध त्याच्या हातातातून वर्तमानपत्र खेचून घेतो आणि चुरगळून फेकतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive