By  
on  

'देवमाणूस 2'मधील हा सीन शूट करताना डिंपलला फुटला होता घाम

'देवमाणूस' या रहस्यमय थरारक मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेच्या अफाट यशानंतर आता या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मालिकेचे संपूर्ण महाराष्ट्रभर असंख्य चाहते आहेत. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरल्या आहेत. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंगच्या व्यक्तिरेखेतील किरण गायकवाड, टोण्या, सरु आजी, डिंपल, बाबूदादा, मंगलताई, बज्या, नाम्या या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

पहिल्या भागाप्रमाणेच दुस-या भागातही अनेक नवनवी पात्रं एन्ट्री घेत आहेत.त्यामुळे मालिकेतील रहस्य जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली असते. यापैकीच डॉक्टर अजितच्या कुकर्मात त्याला साथ देणारी सिंपल नही डिंपल या भागातसुध्दा बरीच कुरापती करण्यासाठी धडपडतेय. 

डिंपल फेम अभिनेत्री अस्मिता देशमुखने येत्या आगामी भागातील एका भागाचं शूटींग करताना आलेला अनुभव सोशल मिडीयावरुन शेयर केला आहे. सोशल मिडीयावर अस्मिता लिहते, डिंपल या पात्राने नाव आणि ओळख मिळवून दिली...प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले...पण नुकताच मालिकेतला एक प्रसंग चित्रित करताना अंगावर काटा आला..हा प्रसंग चित्रित करण्याआधी मी खूप घाबरले होते आणि नकारही दिला होता..पण दिग्दर्शक आणि सहकलाकारांनी प्रोत्साहन दिल्यानंतर हा प्रसंग चित्रित झाला. कलाकार म्हणून डिंपलची व्यक्तिरेखा निभावताना जितकी गंमत येते तितकाच कधी कधी त्रास ही होतो.. देवमाणूस ही अशी मालिका आहे जिथे कलाकाराचा खरा कस लागतो. अनेकजण भेटून सांगत होते की या सीझनला थोडी गंमत कमी वाटते तर त्या आमच्या प्रेक्षकांना मी आवर्जून सांगेन की खरा खेळ तर आत्ता सुरु होतोय..या आठवड्यातले एपिसोड अजिबात मिस करु नका...डिंपल नाम सुन के सिंपल समझे क्या...सिंपल नहीं डेंजर है मैं.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive