By  
on  

आई कुठे काय करते: अरुंधतीचा बदलला लुक, लवकरच सोडणार देशमुखाचं घर?

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे. मधुराणी साकारत असलेली अरुंधती देशमुख ही व्यक्तिरेखा आज अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातली ताईत आहे.

सध्या मालिकेच्या ट्रॅकनुसार अरुंधती एका वेगळ्या लुकमध्ये पाहायला मिळतेय. आशुतोषसोबत अलिबागला गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी गेलेली अरुंधती ही तिथेच अडकते. तेव्हा आशुतोष व अरुंधती अलिबाग येथेच  ॉएका कुटुंबात रात्र काढण्याचं ठरवतात. चिखलाचं पाणी उडाल्याने अरुंधतीची साडी खराब होते. म्हणूनच त्या घरातल्या वहिंनीचा ड्रेस घालून अरुंधतीला मुंबईला परतावं लागतं. तेव्हा घरात पोहचताच आधीच संतापाने लालबुंद झालेला अनिरुध्द देशमुख तिला नको नको ते बोलतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सध्या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अनिरुद्धवर आरोप करतो की ती कामाच्या निमित्ताने मित्रासोबत रात्र घालवून आली आहे. त्यावर उत्तर देत अरुंधती बोलते, “आता मी अरुंधती देशमुखही नाही आहे. तर माझ्याशी बोलताना पातळी राखून बोलायचं.” यावर आई अरुंधतीला बोलतात, “पण अरुंधती…. आईंना मध्येच थांबवत अरुंधती बोलते, तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेतलात. आता मी इथे नाही राहू शकत,” असं म्हणतं अरुंधती घर सोडून निघून जाते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive