By  
on  

येऊ कशी तशी मी नांदायला मालिका घेणार निरोप, स्वीटू झाली भावूक!

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेने अल्पावधितच रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. ओम-स्वीटूची लय भारी केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. अनेक अडथळे आणि अडचणींचा सामना करत ओम-स्वीटूचं लग्न झालं व ते एकरुप झाले. आता स्वीटू लवकरच आई होणार आहे. तर ओम बाबा.  खानविलकरच्या घरात चिमुकल्या पावलांनी आनंद येणर आहे.ही मालिका आता निरोपाच्या उंबरठ्यावर असून या मालिकेच्या जागी स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची तू तेव्हा तशी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे नायिकेच्या सा-या व्याख्याच बदलल्या. गोड आणि लाघवी स्वीटू साकारणा-या अन्विता फलटणकरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ही मालिका आता एक्जिट घेत असल्याने अन्विताने एक भावूक पोस्ट केली आहे. स्वीटू साळवींच्या घराच्या खिडकीतून उदास बसलेली पाहायला मिळतेय, ही पोस्ट करत अन्विता लिहते, साळवींच्या घराची मला खुप आठवण येतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive