जन्मदात्या आईवर विश्वास न ठेवता सुहानीला बाहेरचे जग प्रिय वाटते. पण आता सुहानीच्या नकळतच तिच्यावर ओढवलेल्या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी आईचा मात्र कस लागतो. वाट चुकलेल्या मुलीला परत सुखरूप घरी आणण्यासाठी मीनाक्षी जीवाचे रान करते. अनेक पुरावे हाती लागून सुद्धा सुहानी मिळत नाही. बर्याचदा जवळचा माणूस संशयित म्हणून समोर येतो, त्याक्षणी देखील मीनाक्षी धीर न सोडता त्याला सामोरी जाताना दिसते. पण आता आई मायेचं कवच या मालिकेत एक रंजक वळण येणार आहे.
सुहानीची आई म्हणजेच मीनाक्षी ही तिला शोधण्यासाठी आजच्याच युवा पिढीतल्या काही तरुणाईचं रुप घेणार आहे. लेकीच्या सुटकेसाठी आईने घेतलेलही ही मेहनत किती फळाला लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान सुहानीची आई साकारणा-या भार्गवी चिरमुलेचं हे जीन्स टॉपमधील हटेके लुक प्रेक्षकांना खुप आकर्षित करतोय. त्यामुळेच आगामी भागांची आतुरता लागून राहिली आहे.