By  
on  

माझी तुझी रेशीमगाठ : यशला बाबा म्हणून स्विकारण्यास परीने दिला नकार

सध्याच्या अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी झी मराठी वाहिनीवरील एक मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ.’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ही मालिका अल्पावधितच रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा व यशवर्धनच्या लव्हस्टोरीमध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळाले आहेत. 

यश आणि नेहाच्या लव्हस्टोरीमध्ये गोड परी हेसुध्दा एक सुंदर वळण आहे. यशला फ्रेंड म्हणून हाक मारणारी परी आता त्याचा बाबा म्हणूून स्विकार करेल का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. नुकताच मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. मध्ये नेहा आणि यश त्यांच्या नात्याबद्दल बंडू काका-काकूंना सांगतात. त्यावेळी त्यांनी खूप आनंद होतो. हे चौघेजण बोलत असतात. तेव्हा बंडू काका यशच्या मांडीवर बसलेल्या परीला म्हणतात, 'हे आहेत परीचे बाबा...'त्यावर परी त्यांना विचारते 'कोण माझे बाबा?'

बंडू काका यशकडे बोट दाखवकत तिला म्हणतात, 'हे.. आता यापुढे परीने काही मस्ती केली तर मी येऊन तिचे नाव तिच्या बाबांना सांगणार.' त्यावर परी चिडून सगळ्यांना म्हणते की, 'हे माझे बाबा नाहीत. हा माझा फ्रेंड आहे. बाबा लोक सोडून जातात. मला बाबा नको....' असे म्हणून ती घराबाहेर पळून जाते... तिचे हे बोलणे पाहून यश, नेहा आणि बंडू काका-काकू यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसतो.हे पाहून नेहा व यश दोघेही अवाक् होतात. 

 

 

परीने नकार दिला म्हणून यश आणि नेहा एकमेकांपासून दुरावणार का? नेहा आणि यश परीची समजूत घालण्यात यशस्वी ठरणार का?हे जाणण्यासाठी मालिकेच्या आगामी भागांची उत्सुकता आहे. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive