By  
on  

Video : रेणुका शहाणे यांचं छोट्या पडद्यावर पुनरागमन, झळकणार या कार्यक्रमात

झी मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी दर्जेदार मालिका सादर करून त्यांचं भरगोस मनोरंजन करते. बँड बाजा वरात या झी मराठीवरील आगामी कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांना सुरुवाती पासूनच खूप उत्सुकता होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक कोण? हा कार्यक्रम कधी भेटीला येणार? हे आणि असे बरेच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होते आणि वाहिनीने नुकतंच एका नवीन प्रोमो सोबत या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री रेणुका शहाणे आणि अभिनेता पुष्कराज चिरपुटकर सांभाळणार असून हा कार्यक्रम १८ मार्च पासून शुक्रवार आणि शनिवार रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या कार्यक्रमातून लग्नघरातील नववधू-वारांना झी मराठीकडून भरगोस आहेर मिळणार आहे. नुकतंच वाहिनीवर रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये रेणुका शहाणे झी मराठीकडून जबरदस्त आहेर लग्नघरात सप्रेम भेट म्हणून घेऊन जाताना दिसत आहेत. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम लग्नघरातील धूम अनुभवण्यासाठी सज्ज झाला आहे तेव्हा प्रेक्षकसुद्धा मनोरंजनाच्या भरगोस आहेरासाठी तयार असतील यात शंकाच नाही.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive