By  
on  

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर अभिनेत्री निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे यांची उपस्थिती!

 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस स्पर्धा रंगात चालली असून लवकरच पहिल्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. यंदाच्या आठवड्यात अभिनयाच्या क्षेत्रातल्या दोन दिग्गज अभिनेत्री मंचावर येणार आहेत. ९० चं दशक गाजवणाऱ्या दोन लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे यांनी सुरांच्या मैफिलीचा आस्वाद घेतला.

'इंडियन आयडल मराठी'च्या आगामी भागात सुरांच्या मंचावर आठवणींचा पेटारा उघडला जाणार आहे. अभिनेत्री निवेदिता आणि प्रिया यांनी त्यांच्या आठवणी सांगून, त्यांच्या कामाविषयी बोलून सगळ्यांनाच ९०च्या दशकात नेलं. स्पर्धकांनाही स्वतःच्या आवडीची गाणी सादर करण्याची मुभा असल्याने एकंदरीतच येणारा आठवडा प्रेक्षकांसाठी विशेष असेल यात शंका नाही.

या भागात विविध प्रकारची सुरेल गाणी स्पर्धक सादर करणार आहेत. पाहायला विसरू नका सोमवार ते बुधवार, रात्री 9 वाजता 'इंडियन आयडल मराठी' फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive