By  
on  

'आई कुठे काय करते'च्या अरुंधतीचा हा दिलखेचक व्हिडीओ पाहिलात का?

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये तिची आई म्हणूनच आता ओळख निर्माण झाली आहे. मधुराणी साकारत असलेली अरुंधती देशमुख ही व्यक्तिरेखा आज अवघ्या महाराष्ट्राच्या गळ्यातली ताईत आहे.

सोशल मिडीयावर अरुंधती नेहमीच सक्रीय असते. मालिकेविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी , सीन्सविषयी त्यातील महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल ती सतत व्यक्त होत असते. तिच्या प्रत्येक पोस्ट-व्हिडीओंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात.नुकतंच मधुराणीने स्टार प्रवाहच्या पुरस्कार सोहळ्यात एक खास नऊवारी नेसली होती. या नऊवारी साडीत तिने एक झक्कास व्हिडीओ शेयर केला आहे. 

 

;चिंतामणी रंगाच्या नऊवारी साडीतला अरुंधतीचा हा व्हिडीओ खुप व्हायरल होत असून चाहते त्यावर लाईक्सचा वर्षाव करतायत. यात तिच्या घायाळ करणा-या अदा पाहायला मिळतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive