By  
on  

'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांची एन्ट्री!

सोनी मराठी वाहिनीवरील 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेला सध्या रंजक वळण मिळाले आहे. श्रद्धा आणि अभय मिरजकर यांची मुलगी सावनी बेपत्ता झाली असून श्रद्धा आपल्या मुलीला शोधण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करते आहे. पोलिसांकडून श्रद्धावर कडक नजर ठेवण्यात येते आहे. त्यातच या शोधात श्रद्धाला भेटलेली 'ताई' श्रद्धाच्या जिवावर उठली आहे. त्यामुळे आता श्रद्धा आपल्या मुलीला शोधू शकेल का, सावनी खरंच गुन्हेगार असेल का, अशा प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमधून पाहणं प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरणार आहे. त्यातच ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांची एन्ट्री आता मालिकेत झालेली असल्याने मालिकेत आणखीनच रंजकता येणार आहे.

'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेत श्रद्धा आपल्या मुलीच्या, सावनीच्या शोधासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतेय. या सगळ्या शोधात ती ताई नावाच्या एका कुख्यात स्त्रीकडे जाऊन पोचली, पण ताईला पकडून देण्यासाठी तिने पोलिसांना मदत केली. त्यामुळे ताईच्या विरोधात गेल्याने ताई श्रद्धाच्या जिवावर उठली आहे आणि तिच्या मदतीला आता 'व्यंकट सावंत' आला आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते संजय मोने 'व्यंकट सावंत' नावाचे पात्र साकारत आहेत.

संजय मोने यांचे 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेमधून अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले आहे. श्रद्धाचा जीव घेण्यासाठी आलेल्या ताईच्या माणसांपासून व्यंकट सावंत श्रद्धाला वाचवतात. व्यंकट सावंत या पात्राचा उल्लेख आत्तापर्यंत श्रद्धाचे वडील म्हणून आला आहे. संजय मोने यांचा दर्जेदार अभिनय आणि वेगळा ठसका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. मधुरा वेलणकर, संजय मोने यांसारखी तगडी कलाकार मंडळी मालिकेत असल्याने या मालिकेची रंगत आणखीनच वाढणार आहे.

श्रद्धाचा शोध संपेल का, सावनी खरंच निर्दोष असेल का, ताईपासून श्रद्धाचा जीव वाचेल का, अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी पाहत राहा; 'तुमची मुलगी काय करते?' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive