By  
on  

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत ज्ञानेश्वरीला आरंभ!

सोनी मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेत आता नव्या अध्यायाला सुरूवात होणार आहे. २० मार्चपासून ज्ञानेश्वरीच्या लिखाणाचा आरंभ होणार आहे. मालिकेत माउलींचे विविध चमत्कार प्रेक्षकांना बघायला मिळाले आहेत. माउलींना मिळालेला अनुग्रह, रेड्यामुखी वादवलेले वेद, माउलींचा पहिला कीर्तन सोहळा अशा अनेक कथांनी प्रेक्षक भक्तिमय झाले. पण आता मालिकेत भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीने ज्ञानेश्वरीचा आरंभ होणार आहे. मालिकेत श्रीकृष्ण हे पात्र अभिनेता अक्षय वाघमारे साकारणार आहे.

ज्ञानेश्वरीच्या साथीने माउली विश्वउद्धार करणार असून प्रेक्षकांना ज्ञानेश्वरीचा अवर्णनीय अनुभव अनुभवायला मिळणार आहे. कोणतीही संकट न येता माउली ज्ञानेश्वरी लिहू शकतील का? ज्ञानेश्वरीच्या साथीने माउली माउली कशाप्रकारे विश्वउध्दार करणार? या सगळ्याची उत्तरे प्रेक्षकांना २० मार्चपासून मिळणार आहे.

 

पाहात राहा, पाहा, 'ज्ञानेश्वर माउली'. सोमवार ते शनिवार, संध्याकाळी ७ वा.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive