By  
on  

मराठी मालिकांमध्ये मीठाचा खडा टाकणा-या खलनायिका एका भागासाठी घेतात इतकं मानधन

मराठी मालिका रसिक प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भागच बनल्या आहेत. मालिकेतील कथानक खरोखर घडतंय असं मानून प्रेक्षक त्यात गुंतत जातो. घरबसल्या, आपल्या लाडक्या मालिकांचा आनंद घेण्यासारखं दुसरं सुख नाही. परंतु दररोज गोड गोड साधं-सरळ कथानक पाहणं म्हणजे मालिका रटाळ होऊन जाईल. त्यात खलनायिकांनी मीठाचा खडा टाकणं किंवा विघ्न आणलं तरच ती मालिका जास्त रंगतदार होऊल म्हणूनच या खलनायिकांचासुध्दा भाव वधारला आहे. मराठी मालिकांमध्ये तडका लावणा-या या खलनायिका एका भागासाठी किती मानधन घेतात, हे जाणून घेऊयात.

आई कुठे काय करते या मालिकेत संजना ही खलनायिका साकारणा-या अभिनेत्री रुपाली भोसले हिने अल्पावधितच रसिकांची मनं जिंकली.

संजना साकारणारी रुपाली भोसले ही एका भागासाठी तब्बल 42 हजार रुपये मानधन घेते

तर रंग माझा वेगळा मालिकेत श्वेता ही खलनायिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अनघा भगरे

अनघा ही एका भागासाठी२५ हजार मानधन घेते.

अभिनेत्री शीतल क्षीरसागर झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत ‘सिमी’ ही भूमिका साकारत आहे.


शीतल या मालिकेच्या एका भागासाठी १८ हजार रुपये घेते.

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर ‘शालिनी’ ही भूमिका साकारत आहे.

माधवी या मालिकेच्या एका भागासाठी ३९ हजार रुपये घेते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive